CBSE
|
Class 3
|
Marathi
|
By - Ratna Shivdas Shejwal
जीवनाच्या विविध क्षेत्रात विचार विनिमयाचे साधन म्हणून आपण भाषा वापरतो. दैनोंदेन व्यवहार पार पाडणे, विचार करणे, ज्ञान ग्रहण आणि ज्ञान संवर्धन करणे, समाज प्रबोधन करणे असे विविध पातळ्यांवरचे व्यवहार माणूस भाषेच्या आधारावरच करु शकतो. भारतीय वंशाच्या विविध समृध्द भाषांपैकी एक मराठी भाषा!! शालेय स्तरावर मराठी भाषा शिकताना विद्यार्थ्यांना अडचणी येऊ नयेत म्हणून या पुस्तकाची निर्मिती करण्यात आली आहे. मुले वयाने लहान असली तरी त्यांची शिकण्याची आणि समजण्याची क्षमता अफाट असते. हा विचार करुनच त्यांच्या 'निरागस आणि कोवळ्या मनावर ताण न देता त्यांना शिकवण्याची जबाबदारी हे पुस्तक पार पाडेल.
आधुनिक पध्दतीने शिक्षणाच्या आवश्यकतेनुसार आणि मुलांची मानसिकता, रुची, ग्रहण क्षमता लक्षात घेऊन आम्ही इयत्ता पहिली ते पाचवीच्या वर्गातील विद्ययार्थ्यांसाठी 'आनंदी' पुस्तक मालिका सादर करत आहोत. पारंपरिक भाषा शिक्षणाच्या ठराविक चाकोरीत न राहता जीवनाच्या विविध पैलूंना स्पर्श करुन विदयार्थ्यांच्या मनात प्रश्न विचारण्याची आणि “आणखी काही' जाणून घेण्याची जिज्ञासा निर्माण करण्याचा प्रयत्न या पुस्तकात करण्यात आला आहे. रचनात्मकता, कलात्मकता आणि परिपूर्णतेनं नटलेल्या या पुस्तकाची ठळक वैशिष्ट्ये:
* ऐकणे, बोलणे, वाचणे आणि लिहिणे या, भाषेच्या चार अपेक्षित योग्यतांचा विकास करण्यासाठी विशेष प्रयल.
* भाषा कौशल्यासाठी गोष्टी, गाणी, बालकथा, बोधकथा, चित्रकथा, पत्रलेखन, गंमतशीर कविता इत्यादींचा समावेश.
* चित्रांद्रारे अभ्यास सोपा आणि मनोरंजक होईल. कारण “हसत-खेळत शिका' हे या पुस्तकाचे धोरण आहे.
« अभ्यासाबरोबरच मुलांवर संस्कार करण्याची जबाबदारीही हे पुस्तक पार पाडेल कारण पाठांमधून विद्यार्थ्यांचा देशप्रेम, निसर्गप्रेम, मोठ्यांप्रती आदर, मेहनत, साहस, सत्य, मैत्री, त्याग, सदाचरण, खेळाडू वृत्ती अश्या अनेक भावनांशी व गुणांशी परिचय होईल.
* भाषेचा मजबूत पाया असलेल्या व्याकरणाच्या तपशीलवार अभ्यासामुळे विद्यार्थ्यांना भाषा शिकणे, समजणे सोपे जाईल.
* शिकवणे, समजावणे, गिरवून घेणे, लिहवून घेणे अश्या क्रमाने पाठांची रचना करण्यात आली आहे. त्यामुळे चढत्या क्रमाने विद्यार्थी शिकतील.
« नवनवीन संकल्पनांचा बिचार या पुस्तकात करण्यात आला आहे. मराठी शब्द व त्यांचे इंग्रजी अर्थ दिलेले असल्याने ते समजणे विद्याथ्यांना सोपे होईल.
« शब्दार्थ, समानार्थी शब्द, विरुध्दार्थी शब्द, यमक जुळणारे शब्द शिकताना त्यांचे शब्द भांडार वाढेल आणि त्यांच्या सामान्यज्ञानात भर पडेल.
* अभ्यासाद्वारे विदयार्थ्यांच्या ज्ञान ग्रहणाचे मूल्यमापन होईल.
* विविध उपक्रमांद्वारे विदयार्थ्यांच्या सृजनशीलतेला वाब मिळेल.
« पुस्तकाच्या आकलनासह विद्यार्थ्यांचा सर्वांगीण बिकास होईल अशी आम्हाला आशा आहे. या पुस्तकाच्या मूल्यमापनासाठी वाचकांचा आणि तज्ञांचा प्रतिसाद आम्हाला हवा आहे. पुस्तकात सुधारणेला काही वाब असल्यास त्यादृष्टीने वाचक आणि तज्ञांच्या सूचनांचेही आमच्याकडे निश्चितच
स्वागत आहे.
लेखिका
Category | Course Book |
Format | Digital Book |
No. of pages | 1 |